श्री शिव महापुराण कथा महोत्सव : पंडित प्रदीप मिश्रा यांचे जल्लोषात स्वागत

मालेगाव | शहरातील कॉलेज मैदानावर उद्या शुक्रवार पासून दुपारी दोन ते पाच या वेळेत श्री शिव महापुराण कथा महोत्सवास ( Shri Shiv Mahapuran Katha Mahotsav) प्रारंभ होत आहे.

महाराष्ट्र राज्यासह सह इतर राज्यातील हजारो भाविक शिव कथा पूर्व संध्येस आज मालेगावी दाखल झाले आहे सुमारे दोन ते अडीच तीन लाख भाविक या कथा महोत्सवास उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे शिव कथेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण मालेगाव नगरी शिवमय झाली आहे.

श्री शिव महापुराण कथा महोत्सवासाठी आज सायंकाळी सात वाजता पंडित प्रदीप मिश्रा महाराज यांचे मालेगाव शहरात आगमन झाले. मोसम पुलावर हजारो महिला पुरुष भाविकांनी पंडित मिश्रा यांचे अभूततपूर्व जल्लोषात स्वागत केले.यावेळी ओम नम: शिवाय व शिवभजन गात भाविक मिरवणुकीत सामील झाले होते.

शिव महापुराण कथेसाठी मालेगावसाठी बससेवा
नंदुरबार4 दिवसांपूर्वी

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथावाचक तथा भागवत भूषण पंडित प्रदीप मिश्रा यांची श्री शिव महा पुराण कथा मालेगाव येथे होणार असून यानिमित्त नंदुरबार आगारातर्फे भाविकांच्या सोयीसाठी २३ डिसेंबरपासून नंदुरबार-मालेगाव अशी बस सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची माहिती येथील बस आगार प्रमुख मनोज पवार यांनी दिली.

मालेगाव येथे २३ ते २९ डिसेंबर दरम्यान पंडित प्रदीप मिश्रा महाराज यांच्या मालेगाव येथील श्री शिव महा पुराण कथा साेहळ्यास जाणाऱ्या भाविकांच्या मागणीनुसार धुळे विभागातील नंदुरबारसह इतर आगारातूनही बस सेवा उपलब्ध करण्यात येणार आहे. नंदुरबार शहर आणि तालुक्यातील पंचक्रोशीतील गावांमधून ४४ किंवा त्यापेक्षा अधिक प्रवासी संख्या असल्यास त्यांच्यासाठी तत्काळ बस उपलब्ध करून दिली जाणार आहेत. सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी भाविकांनी नंदुरबार बस आगाराशी संपर्क साधावा, असे आवाहन येथील आगाराचे प्रमुख पवार यांनी केले आहे. त्यासाठी संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *